मुंबई, दि.२१_ बृहन्मुंबई महानगरपालिकेतील कामगारांच्या वतीने फोर्ट परिसरात ए विभागातील कामगारांच्या वतीने संयुक्त जयंती साजरी करण्यात आली. यावेळी विभागातील कामगार उपस्थित होते.
दर वर्षाप्रमाणे या वर्षीदेखील महामानवांची जयंती देशभरात हर्षौल्हासात साजरी होत आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या ए वार्डातील रामपर्ट चौकीच्या कामगार कमिटीतर्फे भगवान बुद्ध, छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची संयुक्त जयंती महोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी आयोजकांच्या माध्यमातून सकाळी अल्पोहरचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी कामगार आणि अधिकारी वर्गाने आपले मनोगत व्यक्त करत उपस्थितांचे प्रबोधन केले. विभागातील कामगार आणि अधिकारी वर्गाने मोठ्या संख्येने कार्यक्रमाला हजेरी लावत महामानवापुढे नतमस्तक झाले. कमिटीच्या माध्यमातून दुपारच्या वेळी भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती, त्याचा उपस्थितांनी मनसोक्त आस्वाद घेतला. कमिटीच्या माध्यमातून उपस्थितांचे आभार मानण्यात आले.




