भारतीय निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार ‘ विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रम – २०२६ ‘ ( SIR ) अंतर्गत मतदार यादी अद्ययावत करण्याची प्रक्रिया सुरू आहे. BLO (बूथ पातळी अधिकारी) मतदारांच्या पडताळणीसाठी तुमच्या घरी भेट देणार आहेत. या मोहिमेत तुमच्या भागातील बीएलओ प्रत्यक्ष घरी येऊन माहितीची खात्री करतील. मतदार याद्या अचूक आणि अद्ययावत करण्यासाठी निवडणूक आयोगाने विशेष ही मोहीम हाती घेतली आहे. मतदार यादीत तुमचे नाव, पत्ता आणि वय बरोबर आहे का याची खात्री केली जाईल. नव्या मतदारांची नोंदणी कुटुंबात १८ वर्षे पूर्ण झालेल्या नवीन मतदारांची नाव नोंदणी केली जाईल. दुरुस्ती आणि वगळणी मृत किंवा स्थलांतरित व्यक्तींची नावे यादीतून वगळली जातील, तसेच नावांमधील चुका दुरुस्त केल्या जातील. फोटो अपडेट मतदारांचे जुने किंवा अस्पष्ट फोटो बदलून नवीन फोटो घेतले जातील. नागरिकांसाठी महत्त्वाची बीएलओ घरी आल्यावर नागरिकांनी आपले मतदार ओळखपत्र, आधार कार्ड किंवा इतर आवश्यक कागदपत्रे सोबत ठेवावीत. प्रशासनाने सर्व नागरिकांना या प्रक्रियेत पूर्ण सहकार्य करण्याचे आणि आपली मतदार नोंदणी निश्चित करण्याचे आवाहन केले आहे.


